पंकजा नावाचं विकास पर्व ते महाराष्ट्राच्या नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे ….

इतर लेख

पंकजा नावाचं विकास पर्व ते महाराष्ट्राच्या नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे ….

सध्याच्या परिस्थितीमधे महाराष्ट्र आज राजकीयदृष्ट्या एका वेगळ्या वळणावर पोहचला आहे कारण जे परंपरागत राजकीय पक्ष आहेत त्यांना छेद देत वंचित आघाडी आणि सर्वात प्रभावी पक्ष म्हणून भाजपाचं निर्माण झालेलं स्थान आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचा ओसरलेला प्रभाव होय. सरकारच्या पूर्ण कार्यकाळात जेवढी आंदोलने आणि मोर्चे सर्व महाराष्ट्रालाच नव्हे देशाला प्रभावित करणारे झाले त्याचं केंद्र आमची परळी राहिली त्याचं एक आणि एकमेव कारण म्हणजे परळीच्या मातीतल्या या पंकजा गोपीनाथ मुंडे नावाच्या व्यक्तीला राजकीय दृष्ट्या अडचणीत आनण्यासाठीच हे न समजण्या इतपत दुधखुळे इथली लोकं नक्कीच नाहीत असो कारणं काहीही असू द्या पण या सर्व परीक्षांमधे मेरीट ने आपण पास झालात ताई.स्वकीयांपासून ते विरोधकांपर्यंत आपणास घेरण्याचे काम ज्या पद्धतीने केले जाते तेवढ्याच ताकतीने आपल्यावर प्रेम करणारे लोक एकवटतात म्हणजे नेतृत्व जेवढं अडचणीत असेल तेवढं नेतृत्वावर तीव्र प्रेम व्यक्त करणे हा अनुवंश असलेली कार्यकर्ते सर्वदुर आजही तुमच्या एका हाकेवर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी अतिशय भक्ति भावाने येऊ शकतात हे पुन्हा एकदा सावरगांव येथील “भगवान भक्ती गडाच्या” निर्मिती निमीत्त आपण साऱ्या जगाला दाखवून दिलेच आहे.2014 च्या निवडणुकीचं आकर्षण पंकजाताई आपण एकमेव होतात आताच्या या बदलत्या परिस्थिती मधे मागच्या काही काळात जाणीवपूर्वक काही गोष्टिपासून आपणास दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची भावना माझ्या मनात आहे परंतु येणारी सत्ता ही पंकजा मुंडे या वाघिनीच्या प्रयत्नाशिवाय मिळवणे अशक्य आहे.स्वतःच्या नावाचा दबदबा काय असतो ते गोपीनाथ गड येथील 3 जुन 2019 च्या कर्यक्रमात दस्तूर खुद मुख्यमंत्र्यां समोर साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे ही काय पाहिली वेळ नव्हती की ताईंच्या हाकेवर एवढी लोकं एकवटतात दसरा मेळावा, गोपीनाथ गडावरील साहेबांची जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम ,सावता परिषद , चोंडीचा मेळावा ,सामूहिक विवाह सोहळा , द टर्निंग पॉइंट च्या माध्यमातून गुणवंतांचा केलेला सन्मान असो प्रत्येक वेळी नाविन्यपूर्णरित्या लोकाना एकत्रित करुण आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून देणे हे तर ताईंकडूनच शिकावे. आपल्या संपर्काच्या अभावाच्या नावाने कड़ू वाळकं नेहमी तोडली जातात यावर येणाऱ्या काळात आपण समाधान कराल ही अपेक्षा ठेवतोच कारण कामाच्या एवढ्या व्यापातुन वेळ मिळने हे ही आम्ही समजू शकतोत.

सर्वसामान्य माणसांच्या प्रेमाच्या शिदोरीवर मोठं झालेलं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब होते. पांढरपेशा लोकांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाला ग्रामीण भागात, वंचित अठरापगड जातीधर्मापर्यंत पोहचवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. महाराष्ट्रभर, देशभर फिरुन स्वतःची एक वेगळी ओळख, निर्माण केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, लोकसभेचं उपनेते पद भूषविलं. खूप तपश्‍चर्येनंतर केंद्रात सरकार आले आणि साहेब केंद्रीय मंत्री झाले. सतत दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या बीड आणि मराठवाडयाला चांगले दिवस येण्याचा पर्व सुरु झाला असं वाटलं. पण नियतीला वेगळच काही मान्य होतं. साहेब गेले आणि डोळ्यासमोर उभा होत्या विधानसभा निवडणूका. ज्यात स्वतः बरोबर आपल्या वडिलांच्या नावाभोवती जमा झालेलं महाराष्ट्र भरचं वलय सांभाळण्याचं आव्हान पंकजा ताईंवर…!

ज्याप्रमाणे मुंडे साहेबांनी सत्ता परिवर्तनासाठी संघर्षयात्रा काढली. त्याच प्रमाणे २०१४ च्या विधानसभा निवडणूकांपूर्वी पुन्हा संघर्ष यात्रा काढून पंकजाताईंनी स्वतःच्या नेतृत्वाची चुणूक दाखवून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आणि सत्तापरिवर्तन केले आणि खर्‍या अर्थाने आपल्या पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी एका लेकीने जिवापाड परिश्रम घेऊन उभारलेला लढा यशस्वी झाला.

सर्वांबरोबर पंकजाताईंना वाटत होते, की सरकार आलं. चांगलं झालं. लढा संपला. परंतू नव्या लढाईची सुरुवात आताच झाली होती. कारण सरकार येण्याच्या कारणांमध्ये मुंडे साहेबांची सहानुभूती जशी महत्वाची वाटत होती तीच सहानुभूती पंकजाताईच्या नेतृत्वाकडे पाहताना होती. ताईंचे नेतृत्व पुढं यावं हे नेतृत्व वाढावं यासाठी सर्वसामान्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे ताईंचं नेतृत्व जोपासलं होते. परंतू आता परीक्षा सुरु झाली होती ताईसाहेबांची कारण स्वतःबरोबर मुंडे साहेबांच्या अनुयायांच्या आशा-अपेक्षांचं ओझं पंकजाताईंच्या खांदयावर होतं. याला समर्थपणे पेलण्याचं कार्य पंकजाताईंकडून अपेक्षित होते. ज्याप्रमाणे पंकजाताईंना मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक वारशामध्ये मिळाले होते त्याचप्रमाणे मुंडे साहेबांचे विरोधकही वारशामध्ये मिळालेले होते. यासर्व परिस्थितीचं दंद्व मध्य साधत पंकजाताई समोर आव्हान होते ते स्वतःची ओळख निर्माण करायची…!

राज्यमंत्री मंडळाच्या शपथविधीचा प्रसंग आठवतो. एवढ्या मोठ्या मैदानातला मी ही एक साक्षीदार होतो. सर्व दिग्गज राजकारणी उपस्थित होते. परंतू जेव्हा लोकनेत्याच्या वारसदाराची इन्ट्री झाली तेंव्हा एखादया सेलीब्रीटीपेक्षा जास्त टाळ्यांचं अभिवादन पंकजाताईंना मिळालं संपूर्ण मैदान उभा होतं पंतप्रधानांच्या साक्षीने. वृत्तपत्रे, मासिके, व्हॉटस्ऍप, फेसबुक, ट्युटर, लोकल इलेक्ट्रॉनिक मिडीयापासून ते राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये पंकजा मुंडे या नावाचा गवगवा सुरु होता. त्याला साजेसे काम ताईंच्या माध्यमातून व्हावं हीच सर्वसामान्यांची अपेक्षा होती. त्याचाच प्रत्यय आपणास दिसतो तो म्हणजे ताईंकडे असलेल्या जलसंधारण खात्यामार्फत महाराष्ट्रभर झालेलं सिमेंट बंधार्‍याचं जाळं कधी नव्हे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी शेतकर्‍यांच्या डोंगर दर्‍यात, बांधावर, नदी,नाल्यावर खर्च करुन पाणी अडवा पाणी जिरवाची महत्वाची कामं झाली. अमिरखानच्या आणि सेवाभावी संस्थांच्या सहाय्याने ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप सारखी स्पर्धा राबवून लोकसहभागातून जलसंधारणाची एक चळवळ निर्माण झाली.

कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करुन वर्षानुवर्षे परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचा रखडलेला प्रश्‍न पुर्णत्वाकडे नेण्याचं काम पंकजाताईच्या माध्यमातून दिसून आलं. बीड जिल्ह्यामधून तुटका फुटका एक राष्ट्रीय महामार्ग अशी अवस्था होती. परंतू केंद्रात पाठपुरावा करुन आज बीड जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जाईल असं जाळं निर्माण करुन त्याच्या मान्यता घेतल्या कामं लवकरच सुरु करु असा विश्वास दिला आणि कामं अंतीम टप्प्यात आली एक अपवाद परळी अंबाजोगाई सोडला तर बाकी सर्व रस्ते योग्य पद्धतीने झाली आहेत.पीक विम्याच्या आणि दुष्काळी अनुदान निधीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात कोट्यावधीचा निधी खेचून आणून शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसारखी महत्वाकांक्षी योजना सुरु करुन बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांपर्यंत पक्के रस्ते पोहचवण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचं नियोजन ताईंनी केले.मागच्या 30-40 वर्षात जेवढा निधी बीड जिल्ह्यासाठी आला असेल त्यापेक्षा नक्कीच काकनभर निधी या मागच्या साडे चार वर्षात पंकजाताईंच्या माध्यमातून जिल्ह्यात आलेला आहे.आतापर्यंतच्या जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा बदलण्याचं काम ताईंनी सुरु केलं ते चांगल्या अधिकार्‍यांना नियमानुसार काम करण्याची संधी देवून त्यात कसलाही राजकीय हस्तक्षेप टाळला आणि कामाच्या गुणवत्तेवर भर दिला. ज्याचा परिणाम आज आपल्याला जिवंत स्वरुपाची कामं दिसतायत. कार्यकर्त्यांना एक वेगळी राजकीय शिस्त लावण्याचे काम ताईंनी सुरु केले. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरच्या निवडणूकांमध्ये ताईंना त्रास झाला. तरीपण ताईंनी जे काम आपल्या मूळ स्वभावाला पटेल तसेच राजकारण करण्याचा स्पष्ट संकेत दिला. जो की सर्वसामान्यांच्या हिताचा, लोकहिताचा निश्‍चित आहे. टक्केवारीचं राजकारण मोडीस काढलं. एका दिवसात चार हजारपेक्षा जास्त लोकांच्या ऑनलाईन बदल्या करुन एक नवा पायंडा पाडला. ज्यामुळे होणारा घोडेबाजार-थांबला तसेच जिल्ह्यात झालेला 950 पेक्षा जास्त अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न मार्गी लावला. सर्व पंचायत समित्यांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध केला व नविन इमारती आज उभा रहात आहेत.

तशाच प्रमाणे ताईंनी राजकीय डावपेचाची झलक दाखवित बीड जिल्हा परिषद ताब्यात आणली. ज्या धस आणि आडसकरांनी मुंडे साहेबांच्या विरोधात खासदारकी लढवल्या त्यांना आपलेसं करुन आपल्यातून महत्वाकांक्षेने इतर पक्षात गेलेल्यांना चेक-मेट दिला. आणि त्याच सुरेश अण्णा धसांना लातूर- -बीड -उस्मानाबाद स्थानिक स्वराज्यसंस्था मतदार संघातून आमदार केले.

प्रत्येक आघाडीवरील निवडणूकांपासून विकास कामात ताईंनी आपलं नाव सिद्ध केलं. जानकर, खोत, आठवले यांना मंत्री मंडळांमध्ये प्रवेश देऊन स्वतःचं वजन सिद्ध केलं. वडिलांच्या नावावर आलेल्या लोकांना न्याय मिळवून दिला. दस्तुरखुद मा.फडणवीस,शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब, जानकर, खोत, शेट्टी,आठवले, खडसे, शिंदे, लोणीकर,खा.सुजय विखे , बंडू जाधव, चिखलिकर तसेच छत्रपतींच्या दोन्ही वारसदारांनी पंकजाताईंना दिलेला बहिनीचा दर्जा आणि कौटूंबिक नातं हीच मोठी शिदोरी आहे.

यशाची आणखी शिखरं सर करण्याची धमक आणि क्षमता पंकजाताईमध्ये आहे. काळ जरी खडतर असला तरी यशस्वी होण्याची जिद्द आणि लोककल्याणाची भावना पंकजाताईंना सर्वकाही मिळवून देण्यास मदत करतील. पंकजा मुंडे नावाचा पताका, राजकारणातील हिमालयाच्या अतिच्युय शिखरावर सदैव फडकत रहावा,महाराष्ट्राच्याच काय देशाच्या सर्वोच्च पदावर ‘पंकजा गोपीनाथ मुंडे’ हे नाव विराजमान व्हावं हिच आजच्या तुमच्या या वाढदिवसा निमित्त मनापासून शुभेच्छा !!!

प्रा.बाळासाहेब शेप
शेपवाडी, ता.अंबाजोगाई
मो.७७२१०७०९०८

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *