मुळव्याध म्हणजे काय..?-डॉ.महेंद्र जाधव यांचा माहीतीपर उपयुक्त लेख

अंबाजोगाई आरोग्य

मुळव्याध म्हणजे काय..?
—————————————
“मुळव्याध म्हणजे काय.?मुळव्याध या आजाराविषयी, उपचार पध्दती व घ्यावयाची काळजी जाणुन घेऊया.20 नोव्हेंबर हा जागतिक मुळव्याध दिन म्हणून नुकताच जगभर साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने वाचकांना व जनतेला मुळव्याध या आजाराविषयी माहीती व्हावी म्हणून मुळव्याध या आजाराचे योग्य निदान व प्रभावी उपचार करूण रुग्णाला तात्काळ व्याधीमुक्त करणारे डॉ.महेंद्र जाधव यांनी लिहीलेला लेख आपल्या सर्वांच्या माहीतीसाठी देत आहोत….”
———————————————————————–
‘मुळव्याध’ हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे येतात.एक तर हे अवघड जागेचे दुखणे आणि समाजात असलेल्या रूढी-परंपरा मुळे धड सांगताही येत नाही आणि सहन ही करता येत नाही अशा अवस्थेमध्ये व्यक्तीची घालमेल सुरू होते.सर्वप्रथम मुळव्याध सगळ्यांनाच असतो.कधीही दुरुस्त होत नाही.हा फार मोठा गैरसमज समाजात प्रचलित आहे.शौच्याच्या जागी आग झाली किंवा रक्त पडले की, मुळव्याध झाला असे निदान करून तो व्यक्ती मोकळा होतो. आणि मग सुरु होतात विविध प्रकारच्या भयानक उपचार पद्धती.साधारण रुग्ण मुळव्याधाचे निदान व उपचारासाठी सर्वप्रथम गावातील कोण्यातरी औषध देणाऱ्या चाँदसी या नावाच्या तथाकथित व स्वयंघोषीत तज्ञ भोंदू कडे जावून सल्ला घेतो. आणि त्यांनी मारलेल्या भूलथापांना बळी पडून पाण्यासारखा पैसा खर्च केल्या नंतरही हा आजार दुरुस्त होत नाही.या निकषांवर येतो. साधारणपणे शौच्याच्या जागी प्रामुख्याने सोळा प्रकारचे विविध आजार आढळून येतात. यामध्ये मुळव्याध,फिशर,भगंदर हे आजार समाजात रूढ आहेत. सर्वप्रथम मुळव्याध म्हणजे काय.? हे प्रथम समजून घेऊयात.शौच्याच्या ठिकाणी असलेल्या रक्तवाहिन्या वर दाब पडून आतील व बाहेरील बाजूस शिरा फुगुन फुग्यासारखा भाग तयार होणे.फिशर म्हणजे शौच्याच्या आतील त्वचेच्या ठिकाणी जखम होणे किंवा चिरा पडणे.भगंदर म्हणजे शौच्याच्या जागेच्या बाहेरील बाजूस फोड येऊन तो वारंवार फुटणे व तेथेच शौचाच्या आतमध्ये एक नळी सारखा रस्ता तयार होणे म्हणजे भगंदर होय.

मुळव्याध होण्याची कारणे
————————————–
मुळव्याध होण्याची कारणे साधारणपणे ज्या व्यक्तीच्या पचनसंस्थेत वारंवार बिघाड होतो अशा व्यक्तींना हा आजार मोठ्या प्रमाणात होतो.मुळव्याध होण्याची कारणे यामध्ये प्रामुख्याने दुपारची झोप,रात्रीचे जागरण करणे,सतत चिडचिड करणे,सतत बैठक व्यवस्था असणारे अशा विविध कारणांनी मूळव्याध आजार होण्याची शक्यता असते.यामध्ये पचन व्यवस्था बिघडली जाते.यामुळे शौच्याच्या वेळी जोर द्यावा लागतो.शौचाच्या भागातील रक्तवाहिन्या दाब पडल्यामुळे त्या रक्तवाहिन्यांचा फुगा तयार होऊन या आजारांची उत्पत्ती होते.हा आजार मनुष्यामध्ये आढळून येतो.कारण,मनुष्याच्या शरीर रचनेत आमाशय व आतडे (लहान-मोठे) हे उभ्या स्थितीत असल्यामुळे जोर वाढून मुळव्याध होऊ शकतो.

मुळव्याध होण्याची लक्षणे
————————————–
यामध्ये शौच्याच्या वेळी त्रास होणे व रक्त बाहेर पडणे हे प्रमुख व नियमित आढळणारे लक्षण आहे.साधारण मूळव्याधी मध्ये रक्तस्त्राव हा पिचकारी प्रमाणे मोठ्या प्रमाणात होतो. तसेच शौच्याच्या वेळी तिसऱ्या व चौथ्या अवस्थेमध्ये आतील कोंब हे बाहेर येतात व ते हाताला जाणवते.बाहेरील बाजूच्या मूळव्याधीमुळे हे कोंब नेहमीच हाताला जाणवत असते.गुदद्वाराजवळ खाज, कपड्यांवर रक्ताचे डाग,पोट साफ न होणे,अशक्तपणा, चिडचिड वाढणे,भूक न लागणे, अशा प्रकारचे इतर लक्षणे मुळव्याधामध्ये आढळून येतात.

मुळव्याध उपचार पद्धती
————————————–
मुळव्याधीमध्ये विविध उपचार पद्धतींचा वापर केला जातो  सुरुवातीच्या अवस्थेमध्ये थोड्याशा योग्य औषधोपचार व नियमित आहार चुकीच्या गोष्टीचे निराकरण केले.तर आजार पूर्णपणे बरा होतो.पण,यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक असते.यामध्ये हे औषधी उपचारांमध्ये प्रामुख्याने पोट साफ होणारे औषध दिले जाते.त्यामध्ये शौच्याच्या जोर देण्याचे प्रमाण कमी झाले.की, रक्त वाहिन्यांवरील ताण कमी होतो.तसेच चुकीच्या आहार पद्धतीत बदल केला जातो. रक्तस्तंभन करणा-या औषधांचा वापर केला जातो.याच बरोबर स्केलो थेरपी,लेझर उपचार पद्धती,रेडिओ फ्रिक्वेन्सी, स्टेपलर पद्धत,रबर बॅण्ड, क्षारसूत्र पद्धत या उपचार पद्धतींचा मुळव्याधीमध्ये वापर केला जातो.यामध्ये क्षारसूत्रही अतिशय प्राचीन व सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली उपचार पद्धती यामध्ये विशिष्ट प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो.क्षारसूत्राच्या औषध उपचारामुळे रक्तस्राव होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे साधारण 96 टक्के रुग्णांमध्ये हा आजार पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.

मुळव्याध झाल्यास आहारामध्ये टाळावयाचे पदार्थ
————————————–
यामध्ये अतीमांसाहार, अतिउपवास करणे,अवेळी जेवण,अतीजेवण करणे.हिरव्या पालेभाज्या व फळे यांचा अभाव,चायनीज पदार्थ,ब्रेड बिस्कीट,शाबुदाणा, पिझ्झा,बर्गर यांचे वारंवार सेवन करणे,पाणीपुरी,पावभाजी अधिक प्रमाणात खाणे,अतिशय कमी पाणी पिणे,शौचाला जोर लावणे,अतितिखट,शिळे अन्न खाणे,अशा गोष्टींचे वारंवार अनुकरण केल्यामुळे हे आजार होतात या गोष्टी मुळव्याध असणाऱ्‍याने टाळणे आवश्यक असते.यामुळे मुळव्याध असणाऱ्या रुग्णांनी या आजारासंबंधी योग्य व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले.तर हा आजार पूर्णपणे खात्रीशीर बरा होतो. तसेच योग्य सूचनांचे पालन व योग्य आहार घेतला,योग्य आचरण केले.तर पुन्हा मुळव्याध होण्याची शक्यताही नसते व आपण कायमचे व्याधीमुक्त निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकतो.त्यामुळे न लाजता,न घाबरता योग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा व निरोगी समाजाचे घटक बनून आयुष्याचा आनंद घ्यावा.

लेखक-डॉ.महेंद्र जाधव
(बी.ए.एम.एस)
फेलोशिप इन क्षारसुञ अँड अॅनोरेक्टल डिसीज.
व्यंकटेश मूळव्याध भगंदर हॉस्पिटल,अंबाजोगाई.
मो.नं.-9049504007,
मो.नं.-9403776496.

=======================================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *