तर तुम्हाला सावध राहण्याची गरज

तंत्रज्ञान

तुमच्या मालकीचा कम्प्युटर आहे म्हणून तो कसाही वापरण्याचा प्रयत्न करत असाल तर जपून! कायद्याचं उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके घडामोडींवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने देशातील दहा बड्या एजन्सींना तुमच्या कम्प्युटरवर वॉच ठेवण्याची परवानगी दिली आहे. या एजन्सी एकप्रकारे गुप्तहेराचंच काम करणार असून त्या कधीही आणि केव्हाही तुमच्या कम्प्युटरचा डाटा तपासणार आहेत.केंद्र सरकारने त्याबाबतचा एक आदेश जारी केला असून त्याद्वारे एजन्सीची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार कम्प्युटरमध्ये किती डाटा आहे. कोणता डाटा आहे. तुम्ही काय पाहता? आणि काय स्टोअर करता या सर्वांवर या दहा एजन्सी लक्ष ठेवणार आहेत. म्हणजे सीबीआय, रॉ आणि आयबीसह इतर यंत्रणा तुमच्या कम्प्युटरमध्ये सर्रासपणे डोकावणार आहेत.सध्या या दहाही एजन्सींकडे वेगवेगळी कामे आहेत. एनसीबी ड्रग्स, ईडी आर्थिक गुन्हे, सीबीडी आयकर, डीआरआय तस्करी रोखण्याचं काम करत आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर आता शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ‘घर घर मोदी’चा अर्थ आता समजल्याचा टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *