आयफोन एक्सआर फक्त ४६ हजारात

गॅझेट तंत्रज्ञान

आयफोनचा ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा एक्सआर हा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. indiaistore.com वर ७६ हजार ९०० किंमतीचा आयफोन एक्सआर हा फोन फक्त ४६ हजारांत खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊयात कसा खरेदी करता येतो महागडा फोन ४६ हजारांत….

सध्या कंपनीने या फोनच्या किंमतीत ५ हजार ३०० रुपयांची कपात केली आहे. ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा हा फोन आता ७० हजार ५०० रुपयांना मिळत आहे. त्यानंतर आयफोन स्टोअरमध्ये एक्सचेंज ऑफर सुरु आहे. जुना आयफोन दिल्यास २५ हजार रूपयांपर्यंत कपात केली जाणार आहे. दोन्ही ऑफरची बेरीज केल्यास आयफोन एक्सआर ४६ हजार ६०० रूपयांत मिळणार आहे. जो ग्राहक सिटीबँक किंवा एक्सिस बँकेच्या क्रिडीट कार्डचा वापर करून आयफोन एक्सआर खरेदी करत असेल त्याला अतिरिक्त दहा टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

iPhone XR ची वैशिष्ट्ये

आकार : १५ बाय ७.५ बाय ०.८० सेमी
वजन : १९४ ग्रॅम
बॅटरी : आयफोन ८ प्लसपेक्षा ९० मिनिटे अधिक क्षमतेची ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले, रिझॉल्यूशन (१२९२X८२८)
१२ मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा
स्मार्ट एचडीआर, डेप्थ कंट्रोल, पोर्ट्रेट मोड फीचर्स
आयफोन एक्सआर ६४ जीबी, २५६ जीबी, ५१२ इनबिल्ट स्टोरेज
ड्युअल सिम आणि ब्लूटूथ ५.० फीचर्स
६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीचा पर्याय
पांढरा, काळा, पिवळा, लाल, कोरल या रंगात उपलब्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *