कमी पैशात फिरा ..

भ्रमंती

IRCTC नेहमीच पर्यटकांसाठी खास ऑफर्स घेऊन येत असतं. ज्या पर्यटकांना विदेशवारी करण्याची इच्छा आहे यावेळी त्यांच्यासाठी IRCTC एक खास ऑफर लॉन्च केली आहे. या पॅकेजच्या मदतीने टूरिस्ट 12 रात्री आणि 13 दिवसांमध्ये सात देश फिरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी IRCTC ने या टूर पॅकेजबाबत सर्व माहिती उपलब्ध केली आहे.

आयआरसीटीसी ने इंटरनॅशनल क्रूज टूर पॅकेजची घोषणा केली आहे. ही टूर 26 जूनपासून ते 6 जुलैपर्यंत असणार आहे. पर्यटकांना सात देशांची क्रूज ट्रिप डेनमार्कच्या कोपनहेगनपासून सुरू होणार आहे. भारतातून कोपनहेगनपर्यंत पोहचण्यासाठी पर्यटकांना दिल्लीहून फ्लाइटने जावं लागणार आहे.

डेनमार्कपासून टूर सुरू होणार असून या टूरमध्ये जर्मनी, पोलंड, फिनलॅन्ड, रूस आणि स्टॉकहोम इत्यादी देशांची भ्रमंती करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ही टूर 26 जून रोजी कोपनहेगनपासून सुरू होणार असून पुन्हा कोपनहेगनपर्यंत येऊन संपणार आहे. त्यानंतर पुन्हा पर्यटकांना दिल्लीपर्यंत येण्यासाठी फ्लाइट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

असं असेल टूर पॅकेज :

आयआरसीटीसीच्या इंटरनॅशनल क्रूज टूर पॅकेजमध्ये जर दोन व्यक्ती जात असतील तर प्रत्येक व्यक्तीला 2,95,817 रुपये मोजावे लागणार आहेत. तेच जर तीन व्यक्तींसाठी हे पॅकेज बुक करण्यात येणार असेल तर त्यासाठी प्रति व्यक्ती 2,63,634 रुपये द्यावे लागतील. जर तुम्हीही या टूरला जाण्याचा विचार करत असाल आणि तुमच्यासोबत एकादं लहान मुल असेल तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत.

क्रूज टूर पॅकेजमध्ये तुम्हाला जेवण, स्विमिंग पूल, जिम, वीजा, कोपेनहेगनपासून थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि नाश्ता इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. तुम्हीही जर परदेशवारी करण्याच्या तयारीमध्ये असाल तर आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचा विचार करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *